केज-कळंब रोडवर दुचाकीचा अपघात
रोखठोक न्युज वार्ताहर
केज कळंब रोडवर बुद्ध सृष्टी जवळ असलेल्या तेलेवस्ती जवळ दि. १३ मार्च रोजी रात्री ८:३० वा च्या सुमारास मोटार सायकलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात अजय विजय सिरसट हा जखमी झालेला आहे. या रस्त्याने प्रवास करणारे अशोक बचुटे आणि आरिफ तांबोळी यांनी पत्रकार गौतम बचुटे यांना ही घटना कळविली त्या नंतर गौतम बचुटे यांनी ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि १०८ या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला आहे. रुग्णवाहिका व पोलीस थोड्याच वेळेत अपघातस्थळी पोहोचत आहेत. जखमीची प्रकृती सद्या ठीक आहे मात्र त्याला तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचली आहे.रुग्णाला कंळब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.