मनोज जरांगे-पाटील भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला आहे. सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आणि शेवटपर्यंत काही होईल काय नाही, अशा परिस्थितीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला आहे.
अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजयी ठरलेले बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती येत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.
बीड लोकसभेत विजय झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणेंच्या गाडीला धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत.
रात्री उशिरा धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला आहे. सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आणि शेवटपर्यंत काय होईल काय नाही, अशा परिस्थितीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला आहे.