वाल्मीक(आण्णा) कराड यांच्या सह 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
परळी हत्याकांड प्रकरणी मिळाले वेगळे वळण.
रोखठोक न्युज वार्ताहर
सविस्तर वृत्तांत असे की परळी शहरात 29 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे समर्थक संरपच बापु आंधळे यांची दिवसा ढवळ्या हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती.या मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन गित्ते श त्यांच्या सहकार्याने गोळीबार व कोयत्याने वार करत एकाची हत्या व एकास गंभीर इजा पोहचवली होती.तर यात महादेव गित्ते याला सुद्धा गोळी लागली होती तसेच कोयत्याचा मार होता.यात गोळीबार करणारे बबन गित्ते व सहकारी फरार आहेत.
या हत्याकांडाला वेगळे वळण काल 3 तारखेला लागले आहेत महादेव गित्ते हे जे गोळीबारात जखमी झाले होते त्यांनी धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मीक कराड व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध माझ्यावर गोळीबार व कोयत्याने मारल्याची तक्रार दिली आहे.महादेव गित्ते हे सद्या रूगणालयात उपचार घेत आहेत.
महादेव उद्धव गित्ते यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वाल्मीक आण्णांच्या बंगल्यावर आला नाही म्हणून 15 ते 20 जणांनी महादेव गित्ते यांच्या घरासमोर जावुन शिवीगाळ करत घरावर विटा फेकुन मारल्या तसेच गित्ते यांनी भाडयाने आणलेली स्कॉर्पीओ गाडीची तोडफोड करुन नुकसान केले.सदरील प्रकरण घडताना महादेव गित्ते घराचे बाहेर येताच आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे पोटावर पीस्टलने फायर करुन गंभीर जखमी करत हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात महादेव उद्धव गित्ते (वय 34 वर्ष धंदा प्लॉटींग रा. नंदागौळ ह.मु. बँक कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून गुरन 108/2024 कलम 307,326,323,143,147,148,149,504,506,427 भादवी 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम कायद्यानव्ये बापु आंधळे (मयत) 2) राजेश ऊर्फ धनराज श्रीरंग फड 3) रघुनाथ फड 4) ग्यानोबा ऊर्फ गोट्या मारोती गित्ते 5) सनि देवडे 6) सोमनाथ सलगरे 7) वाल्मीक अण्णा कराड व इतर अनोळखी 15 ते 20 इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास परळी ठाण्याचे सपोनि ससाणे हे करत आहेत.