आरक्षणवाद्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हा – बालाजी जगतकर
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे, पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष रेखाताई ठाकूर, तसेच राज्य कार्यकारणीतील नेते मंडळी येत आहे. आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली असून, त्याची सुरुवात झाली आहे. 30 जुलै रोजी अंबाजोगाई येथील मुकुंदराज सभागृहात सभा झाल्या नंतर ती पुढे गेवराई येथे पोहोचणार दिनांक 31 रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्व आरक्षणवादी व बहुजन समाजातील जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.
आरक्षण बचाव यात्रेची उद्दिष्टे
OBC चे आरक्षण वाचले पाहिजे. SC, ST विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे.OBC च्या विद्यार्थ्यांना SC, ST प्रमाणे शिष्यवृत्ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे,100 OBC आमदार निवडून आणणे.बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी. राज्यातील आणि देशातील जातीची जातनिहाय जनगनणा करावी.ही यात्रा OBC, SC, ST चे सामाजिक आरक्षण, सामाजिक सुरक्षा व राजकीय सत्तासंपादन या क्षेत्रातील परिवर्तनासाठी आहे. आरक्षणावादी पिढीचे भविष्य धोक्यात न जाण्यासाठी राज्यतील SC, ST, OBC च्या तमाम युवक महिला, व्यापारी कर्मचारी, शिक्षक व विचारवंत यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे. संविधान व आरक्षणावादी समुहाचे विरोधी असणारे सरकार व विरोधी पक्षांना आरक्षणावादी वर्गाच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी विविध OBC, SC, ST संघटनांनी पाठिंबा देऊन Slowly शक्तीचे दर्शन घडवावे ही यासाठी आरक्षण बचाव यात्रा येत आहे. जास्तीत जास्त संख्येने आरक्षणवादी व आरक्षणाचा लाभ घेणारे यांनी या आरक्षण बचाव यात्रेत सहभाग नोंदवा असे आव्हान वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे.