गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी शहरातील चौकाचौकात सि.सि.टिव्ही कॅमेरे बसवा.- जयाताई राऊत
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत त्या कारणाने जनते मध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिक भयभीत झाले आहेत. केज शहरात कुठे ही सि.सी.टिव्ही कॅमेरे नाहीत त्यासाठी शहरातील चौकाचौकात सि.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख जयाताई राऊत यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात ग्रामीण भागातील मुली शिक्षणा साठी येतात त्यात मुलीना छेडण्याचा त्याचा दुचाकीवरून पाठलाग करण्याचे प्रमाण जास्त आहे. बाजाराच्या निमित्ताने महिला पुरूष येतात. त्यांचे दागीने पैसे जवळपास ठेवलेले असतात भर दिवसा बस स्टँडवर चोऱ्या होतात चोर निघून जातात कॅमेरे नसल्याने चोर सापडत नाहीत. महिला,मुलीना राञी घरी परत जाण्यास उशीर झाला तर चोरांची,रोडरोमिओची भिती वाटते.अनेक ठिकाणी लुटमारीचे प्रकार घडल्याच्या बातम्या कानी पडतात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच शाळा, महाविद्यालय, क्लासेस या ठिकाणी टवाळखोर पोरं वेगवान गाड्या वरून मुलींना ञास देतात.मुली असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्याने शहरातील चौकाचौकात अशी कॅमेरे बसविल्याने अशा प्रकारांवर आळा बसेल.गुन्हेगारांनचा तात्काळ बंदोबस्त होईल व तात्काळ कार्यवाही होईल त्या मुळे तात्काळ निवेदनाची दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सचिन भैय्या मुळुक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख चंद्रकलाताई बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख जयाताई राऊत यांनी दिले आहे.