न्युज लोकमनच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन.
स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची घोषणा.
रोखठोक न्युज वार्ताहर
न्यूज लोकमनच्या वर्धापनदिन २०२४ च्या निमित्ताने सर्व संगीत प्रेमींसाठी एक रोमांचक गायन स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद वाटत असल्याचे लोकमनचे संपादक संजय जोगंदड यांनी म्हटले असून दिलेल्या पत्रकात त्यांनी नमुद केले आहे की,
तुम्ही एक अनुभवी गायक असाल किंवा फक्त तुमच्या आवडत्या गाण्यांची धून गुणगुणत असाल तर तुमची प्रतिभा दाखवण्याची आणि अप्रतिम बक्षिसे जिंकण्याची तुम्हाला संधी आहे.
लहान गट स्पर्धा ०७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ः३० वा.
तर मोठा गट ०८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वा होणार आहेत स्पर्धेचे स्थळ आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज सभागृह,अंबाजोगाई आहे लहान गट ५ ते १८ वयोगट तर मोठा गट १८ च्या पुढे खुली आहे
स्पर्धेसाठी खालील नियम व अटी लागु आहेत
1) स्पर्धकांना गीत गाण्यासाठी ३ ते ४ मिनिटे वेळ असेल
2) प्रवेश करतेवेळी गाण्याचे बोल चित्रपटाचे नाव हे नोंद करायचे आहेत
3) लहान गटासाठी लाईव्ह आणि ट्रॅक वर गाण्यासाठी परवानगी आहे
४) लाईव्ह गाणे गाण्यासाठी दर्जेदार म्युझिकल ग्रूप ऑक्रेस्ट्राची सुविधा आहे याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी
विजेत्यांसाठी रोमांचक बक्षिसे, रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
राज्यस्तरीय विशेष आकर्षण फिल्मी गीत गायन स्पर्धा (थेट सादरीकरण)
छोटा गट ०५ ते १८ वर्ष असून स्पर्धा दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ः३०वा. आहेत
प्रथम पारितोषिक
दहा हजार रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक
5,000/- रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक
3,000/- रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र
मोठा गट- १८ वर्ष ते पुढे या स्पर्धा दि. ०७ सप्टेंबर सकाळी १०ः३० वा आहेत प्रथम पारितोषिक
एकवीस हजार रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र द्वितीय पारितोषिक
अकरा हजार रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र तृतीय पारितोषिक
पाच हजार रोख रक्कम, मानचिन्ह व सन्मानपत्र
स्थळ: आद्यकवी मुकुंदराज महाराज सभागृह, अंबाजोगाई
दि.०७ सप्टेंबर २०२४ वेळ: सकाळी १०:३० वा.काव्य वाचन स्पर्धा
मोठा गट प्रथम पारितोषिक
10,000/-
रोख रक्कम,
मानचिन्ह व सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक
5,000 रोख रक्कम,
मानचिन्ह व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक
3,000 रोख रक्कम,
मानचिन्ह व सन्मानपत्र असून स्पर्धेचे स्थळ विलासराव देशमुख सभागृह आहे
स्पर्धकांनी आपली नोंदणी 96570 60657 या व्हाटस अप नंबर वर करावी तर
अधिक माहितीसाठी कैलास जोगदंड- 96570 60657 ,न्यूज लोकमन संपादक पत्रकार संजय जोगदंड-8669868468 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
न्युज लोकमनच्या वतीने अधिकारी महिलांना व आदर्श पत्रकारांना पुरस्कार प्रदान होणार असून त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जाणार आहे लवकरच तारखेची घोषणा होणार आहे असेही लोकमन न्युजचे संपादक संजय जोगंदड यांनी कळविले आहे.