• Tue. Sep 10th, 2024

परळी ते बीड बसवाहक महिला कर्मचाऱ्यांची प्रवाशाची उद्धटपणा,व बेशिस्त वर्तन   बसमधील प्रवाशानी प्रश्न विचारले म्हणून चालू प्रवासातील बस 20 मिनिटे थांबवून ठेवली 

Bybaba maske

Aug 26, 2024

परळी ते बीड बसवाहक महिला कर्मचाऱ्यांची प्रवाशाची उद्धटपणा,व बेशिस्त वर्तन  

बसमधील प्रवाशानी प्रश्न विचारले म्हणून चालू प्रवासातील बस 20 मिनिटे थांबवून ठेवली 

रोखठोक न्युज वार्ताहर 

 परळी प्रतिनिधी – परळी ते बीड लालपरी प्रवसात करत असताना प्रवाशासोबत घडलेला हा धक्कादायक , प्रकार आहे, पांगरी ता.परळी येथील पर्यायी नळकांडी पुल वाणनदीला आलेल्या पुरानी चार दिवसा पूर्वीच वाहून गेला आहे. महामंडळाने गेल्या चार दिवसापासून या महामार्गावर बस सेवा वळवली आहे, परंतु रोड निश्चित न केल्याने याचा नाहाक त्रास बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.परळी ते सोनपेठ, सोनपेठ ते शिरसाळा त्यानंतर बीड थेट बीडचे तिकीट मिळत नाही. तात्काळ रूट निश्चित करून थेट परळी ते बीड जाणाऱ्या प्रवासात तिकीट देण्याची व्यवस्था करावी. यामुळे प्रवास करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त भाड्याचा त्रास करावे लागत आहे. यावर आजच आपण निर्णय घ्यावा अन्यथा आपली व आपल्या उद्धट वाहक व चालक यांची तक्रार आपल्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपल्याला अनेक वेळा बस मधून फोन केला आपण फोन उचलला नाही. परळी बीड बस मध्ये प्रवास करत आहे. परळी डेपो ची बसचा क्रमांक MH-20 BL-1882 

 या बसचे चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्यात यावी थेट तिकिटाची मागणी केल्यानंतर, व्यवस्थित बोलण्याऐवजी आपण वरिष्ठांशी बोला, व हुज्जत घालत बस मध्येच रस्त्यावर 15 ते 20 मिनिटं थांबवली, आपण परळी डेपो मॅनेजर यांना बोला असे सांगण्यात आले व नंबर उपलब्ध करून दिला नाही. चर्चा अंति हा आपला नंबर देण्यात आला. हा सर्व प्रकार मी पत्रकार असल्याने सर्व मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होतो, वाहक महिला कंडक्टरणे पत्रकाराच्या हातातील मोबाईल जडप मारून हिसकाटून घेतला, तो बराच वेळ दिला नाही. या वाहक महिलेने उडवा उडवी सर्व बसमधील प्रवासाला वेटीस धरले. एका पत्रकाराला व्हिडिओ करण्यापासून व वार्तांकन करण्यापासून रोखले,अशा हे शिस्त व उद्धटपन्नाची वागणूक देणाऱ्या वाहक व चालकावर योग्य ती कारवाई करा. अन्यथा आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!