• Tue. Sep 10th, 2024

माजी आमदार संगिताताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक. संगिताताई ठोंडरे जखमी.

Bybaba maske

Aug 28, 2024

माजी आमदार संगिताताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक.

संगिताताई ठोंबरे जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडमाऊली येथे गेले असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे यांच्या घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला.त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाल्या  आहेत.त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहे दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!