इच्छुक भ्रमात…मतदार संभ्रमात!! केज मतरसंघ विचित्र परिस्थितीत.
सर्व पक्षीय सुपारीबाज नेत्या मुळे भाजप निवडून येत?
रोखठोक न्युज
केज मतरसंघात इच्छुक भ्रमात तर मतदार संभ्रमात अशी एकूण परिस्थिती आहे.उमेदवारांची रस्सीखेच सद्या तरी मतरसंघात दिसून येत आहे.भाजप कडून आमदार नमिताताई मुंदडा,माजी आमदार संगिताताई ठोंबरे तर राष्ट्रवादीकडून(शरदपवार गटाकडून) माजी आमदार पृथ्वीराज साठे,अंजलीताई घाडगे,रमेश गालफाडे, हे प्रमुख चेहरे तर दिसतात पण अजुन हवशे उमेदवारांची रांग आहे.सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पण उमेदवारी कुणाला भेटते हे महत्वाच आहे त्याच वेळेस निवडणूकीत रंगत येईल पण उमेदवाराच्या भ्रमात असल्याने मतरसंघातील मतदार संभ्रमात असल्याच दिसून येत आहेत.मी उमेदवार मलाच उमेदवारी भेटणार या भ्रमात सगळेच उमेदवार दिसून येत आहेत पण ज्या वेळेस उमेदवारी मिळल व निवडणूका होत्याल त्याच वेळेस जनता यांचा भ्रम काढून टाकेल.
केज मतदारसंघ तसा राखीव मतदारसंघ आहे.या मतदारसंघावर काँग्रेस त्या नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे पण पहिल्यांदा भाजपने स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या रूपाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगदाड पाडले ते होऊ शकले ते फक्त केज मतदारसंघातील सुपारी बाज नेत्या मुळेच आज पंर्यत तरी या मतरसंघावर भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे यांनी भाजप उमेदवार संगिताताई ठोंबरे यांचा पराभव केला.त्यानंतर पुन्हा अडीच वर्षांत संगिताताई ठोंबरे यांनी पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला त्यानंतर 2024 च्या निवडणूकीत पुन्हा संगिताताई ठोंबरे यांना भाजप कडून उमेदवारी न देता राष्ट्रवादीकडून आयात कडून नमिताताई मुंदडा यांना उमेदवारी दिली व मुंदडा कुटूंबाने सुपारी बाज नेत्यांना एकत्र करून नमिताताई मुंदडा यांना विजयी केल.मतरसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्राबल्य आहे.सर्वात जास्त ग्रामपंचायत, जिल्हापरिषद सदस्य, सोसायट्या, अंबाजोगाई नगरपरिषद, केज नगरपंचायत ऐवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात असताना केज मतरसंघात भाजप उमेदवार निवडून येतो कसा हे अश्चर्य नसून फक्त सुपारी बाज नेत्या मुळेच शक्य आहे.अश्या या सुपारी बाज नेत्यांमुळे मुंदडा कुटूंब बिनधास्त आहे कारण त्याना निवडणूक कशी लढवायची हे माहीत झाल आहे त्याच्या समोर कोणीही उमेदवार दिला तर तो या सुपारीबाज नेत्यांना तडजोड करण्यात कमी पडतो यात मुंदडा ची लाॅटरी लागते.केज मतरसंघात तेव्हाच बदल होऊ शकतो जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेईल!!