धारूर तालुक्यात ग्रामस्थांनी चोर पकडला.
चोरी आगोदर फिरत होते ड्राॅन.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड जिल्ह्यात चोरांनी अक्षरश धुमाकूळ घातला असून, शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक ड्रोन व चोराच्या भीतीने भयभीत झाले आहेत. गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यावर ड्रोनच्या घरट्या वाढल्या असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने देखील या ड्रोन चा उलगडा करता आला नाही. धारूर तालुक्यातील सोनमोहा गावाजवळ रात्री दहाच्या सुमारास ड्रोन दिसल्याने गावात चोर आल्याचा संशय ग्रामस्थांना आला, ग्रामस्थ एकत्र झाले. काही वेळात ड्रोन गायब झाल्याने ग्रामस्थ आपल्या घराकडे गेले, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सोनी मोहा गावाजवळी मुंडे वस्तीवरील तुकाराम मुंढे हे आपल्या मोकळ्या अंगणात झोपले असता त्यांना अचानक जाग आली व चोर दिसल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीवरील सर्व जागे होवून त्यांनी तुकाराम मुंडे यांच्या घराला घेरवा घातला असता त्यांना चोर पळून जाताना दिसला परंतु ग्रामस्थांनी त्याला पकडुन चांगला चोप दिला व विचारणा केली असता त्यांनी आणखी दोघे असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या चोराला पकडून धारुर पोलिसांच्या ताब्यात दिले. इतर दोन चोर मात्र अंधार असल्याने पळून गेले.