• Tue. Sep 10th, 2024

चाकुने भोसकून एकाचा खून. खून का बदला खून असल्याचा संशय. 

Bybaba maske

Sep 3, 2024

चाकुने भोसकून एकाचा खून.

खून का बदला खून असल्याचा संशय. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

गेवराई तालुक्यात एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे, आपल्या लहान मुलांचा खून करणाऱ्याच्या मुलाची निघून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून मंगळवारी (3 सप्टेंबर) रोजी दूपारी चार वाजण्याच्या सुमारास पाढरवाडी याठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, बालाजी भगवान गडबडे ( वय 26 वर्ष राहणार पाढरवाडी तालूका गेवराई जिल्हा बीड) असे मयताचे नाव आहे तसेच यांची हत्या करण्यात आली आहे मयताचे वडिल नामे भगवान गडबडे यांच्या विरूद्ध दोन बालकांना उंदिर मारणाचे औषध देऊन ठार मारले असल्याचा गून्हा दाखल आहे आणि आता भगवान गडबडे यांच्या मुलांची हत्या ही अमोल सुखदेव भावले यांनी व त्यांच्या साथीदाराने केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे तसेच याने आपल्या लहान मुलांच्या खूनाचा बदला घेतला असल्याची चर्चा या परिसरात आहे गेवराई तालुक्यातील पाढरवाडी शिवारात एकाची चाकूने भोसकून हत्या झाली असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्तळी हजर झाले व मयताला शवविछेदना साठी बीड जिल्हा रूग्णालयात हलवले आहे तसेच या खून का बदला खून ? या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच आरोपीच्या शोधार्थ तलवाडा पोलिसांचे पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!