ग्रामस्थांनी तीन चोर पकडून यथेच्छ धुलाई करून पोलीसांच्या हवाली केले.
ड्रोन व चोरांच्या भीतीने ग्रामस्थ होते भयभीत.केज तालुक्यातील कानडी येथील घटना.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसापासून चोरांचा सुळसुळाट चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन प्रत्येक गावातून फिरत होते त्या मुळे गावातील नागरिक भयभीत झाले होते.गावातील नागरिक आपआपल्या गावात गस्त घालत होते त्याच वेळेस कानडी माळी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन दिसले व कांही वेळेत एक संशयित स्कॉर्पिओ गाडी कानडीच्या बस स्टँडवर आली त्याला गावकऱ्यांनी वेढा देऊन विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले गावकऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता त्यात हत्यारे दिसून आली त्यामुळे गावकऱ्यांनी चोरानां चांगलाच चोप दिला व पोलीसांना कळवले चोर हे चार चाकी गाडी क्रमांक एम एच 45 A 2421 आले होते.
पोलीसांनी स्कॉर्पिओ गाडीसह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात
1) राहुल काळे, वय 18 रा सरमकुंडी
2)श्रावण महादेव काळे, वय 20 रा. केवड
3) आमोल सटवा घुले वय 21 रा कोठरबन,
चौथा फरार आरोपी अशोक मिसाळ, कोल्हेवाडी असे त्यांचे नाव आहेत
त्यांच्याजवळील तलवार छुरा इतर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना कळवताच त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे राजू वाघमारे चंद्रकांत काळकुटे नितीन जाधव होमगार्ड बाळू थोरात विजय वनवे हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर चोरास ताब्यात घेतले. त्यांनी उपचार साठी उपजिल्हा रुग्णालयात पाटवण्यात आले पोलीस प्रशासन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंद शिंदें करीत आहेत.