दलित-मुस्लिम-मराठा मत काटण्या साठी सिताताई बनसोड यांना विधानसभेत उभा करण्याचा भाजपचा घाट.
रोखठोक न्युज
जशी जशी विधानसभची निवडणूक जवळ येत आहे तस तसे केज विधानसभेच्या निवडणुकीत रंग भरत आहेत. सद्या तरी भाजपकडून विद्यामान आमदार नमिताताई मुंदडा याच उमेदवार असतील अशे वाटत आहे कारण भाजपकडून सद्या तरी त्यांच्या शिवाय दुसरे नाव चर्चेत नाही.
मात्र शरद पवार गटाकडून इच्छुकांच्या रांग लागल्याच दिसत आहे यात माजी आमदार पृथ्वीराज साठे,अंजलीताई घाडगे, संगिताताई ठोंबरे, विजयकुमार व्हावळ हे तरी सद्या शर्यतीत आहेत.यांच्या नंतर बरेच हौसे गौसे उमेदवार इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीकडून(शरदपवार गट) या पक्षाकडून अंजलीताई घाडगे यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता आहे.तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी निवडून येण्याचे चिन्ह दिसत असल्याने व केज मतरसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता गृहीत धरले जात आहे त्याच मुळे भाजपकडून मत काटण्या(वोट कटाव) साठी केज शहरात जनविकास आघाडीच्या नावाने राजकारण करणारे पण भाजप चे निष्ठावंत हारून इनामदार यांचे निकटवर्तीय तथा केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष सिताताई बनसोड यांना केज मतदार संघातून निवडणूकीत उतरवण्याची तयारी चालवल्याची दिसत आहे.
केज नगरपंचायत ला आमदार नमिताताई मुदंडा यांनी विकास कामा साठी दिलेला 80 कोटीचा निधी व त्यातून झालेली मैत्री याची उतराई निवडणूकीत उभे राहून होऊ शकते.
केज विधानसभेत दलित, मुस्लिम मते घेतले तर भाजप उमेदवार निवडून येऊ शकतो त्याच बरोबर जर सिताताई बनसोड यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या कडून उमेदवारी घेणार म्हणचे मराठा मतदान सुद्धा घेणार अश्यात दोन दलित उमेदवारात(दलित-मुस्लिम) मताची विभागणी होऊन भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता बळावते म्हणूनच सिताताई बनसोड यांना भाजपचा डम्मी उमेदवार म्हणून केज मतरसंघातून निवडणूकीत उतरवले जाऊ शकते.