लॉजवर अल्पवयीन मुलगी असल्याच्या चर्चेने केज शहरात खळबळ पोलिसांनी घेतली लॉजची झाडाझडती !
जोडपे सज्ञान असल्याने दिले सोडून.
अंबटशौकीना मुळे लाॅजचे धंदे फुल्ल.
पोलीसांकडून लाॅज कडे जाणूनबुजून कानाडोळा.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील एका लॉजमध्ये एक अल्पवयीन मुलगी ही तिच्या मित्रा सोबत थांबली असल्याची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलिसांनी जावून त्या लॉजची आणि त्या संशयितांची चौकशी केली. या बाबतची माहिती अशी की, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास
केज येथील केज-अंबाजोगाई महामार्गा लगत असलेल्या लॉजवर एक तरुणी ही एका तरुणा सोबत असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना फोन वरून मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस गोपनीय शाखेचे जमादार मतीन शेख आणि त्याचे रायटर संतोष गित्ते
यांना सदर लॉजवर त्या जोडप्याची चौकशी करून व माहिती घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस जमादार मतीन शेख आणि संतोष गित्ते यांनी घटनास्थळी जावून त्या संशयित जोडप्याची चौकशी केली. त्या दोघांची ओळख पटवून त्यांच्या वया सबंधी माहिती घेतली असता ती तरुणीचे वय १९ वर्ष आणि तिच्या
सोबतचा तरुणाचे वय २४ वर्ष असल्याचे त्यांच्या दोघांच्या आधार कार्ड वर नोंदविलेल्या दोघांच्या जन्म तारखे वरून व पत्त्या वरून आढळून आले. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ते दोघेही सज्ञान असल्याचे निष्पन्न झाले.
लॉजच्या मॅनेजर कडून नोंदणी रजिष्टरची पडताळणी केली असता लॉजची रूम भाड्याने घेताना त्यांनी
दोघांचे आधार कार्ड देखील पुराबा म्हणून जमा केला असल्याचे आढळून आले. मात्र तो पर्यंत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगल्याने अनेकांना ही घटना माहित झाली होती. त्यामुळे प्रत्येकजण ते जोडपे कोण ? ते कोणत्या गावचे ? ते कोण्या धर्माचे असावेत ? त्यांना पोलीस ताब्यात घेतात की, सोडून देतात ? लॉजच्या मॅनेजरसह मालकावर काय कारवाई होते? अशी दबक्या आवाजात आणि चवीने चर्चा करीत होते. दरम्यान त्या तरुण व तरुणी यांचे जोडपे हे सज्ञान असल्याने आणि ते दोघे त्यांच्या सहमतीने लॉजवर गेले असल्याने तसेच त्यांची एकमेकां विषयी काही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.पण केज शहरात लाॅज चा सुळसुळाट झाला आहे चंदनसावरगाव पासुन केज ते मस्साजोग पर्यंत लाॅज चा बाजार मांडला आहे.फक्त लाॅजेस अंबटशौकीन यांच्या जिवावर चालू आहेत खाली बियरबार,परमीट रूम व वरी लाॅज चा गोरख धंदा चालू आहे. पोलीसांकडून अर्थ पुर्ण नियोजित कानाडोळा केला जातोय का असा प्रश्न जनतेतून केला जात आहे.यात तरूणाईची भुमिका मोठी आहे.त्या मुळे चांगल्या,गरीब लेकीबाळीच नुकसान होत आहे.कुठे लग्नाचे अमिष दाखवून तर कुठे सहमतीने हे धंदे लाॅज वर चलतात. त्याला कुठे तरी लाॅज वर पोलीसांकडून अंकुश ठेवला जावा असे जनतेतून चर्चा आहे.