• Tue. Nov 24th, 2026

केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! दुष्काळात केजकरांच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची बेफिकिरी! ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; पाण्यासाठी नागरिकांची वणवण दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला, ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; केजकरांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ!

Bybaba maske

Nov 24, 2026

केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर!

दुष्काळात केजकरांच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची बेफिकिरी! ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला, ना आमदारांची बैठक, ना नगराध्यक्षांचा पुढाकार; केजकरांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ!

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज – केज तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊन महिना उलटला, मात्र केज शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अद्याप ना आमदारांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते, ना नगराध्यक्षांनी बैठक घेऊन ठोस उपाययोजना केल्याचे! दुष्काळाचे संकट दारात उभे असताना केजकरांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक आहे.

पाणी असतानाही पंधरा दिवसांनी नळाला पाणी!

केज शहरात पाण्याचा साठा उपलब्ध असतानाही नगरपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळत होते. आता तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला असताना पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज होती. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.

शहरातील काही भागांत तर अद्याप नगरपंचायतीचे पाणी पोहोचतच नाही. अशा भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नेमके कोणाकडे दाद मागायची? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

विहिरी, विंधनविहिरी अधिग्रहित करण्याची तयारी कुठे?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपलब्ध विहिरी आणि विंधनविहिरींचा आढावा घेऊन त्या पाणीपुरवठ्यासाठी ताब्यात घेणे, टँकरची आवश्यकता निश्चित करणे, पाणी वितरणाचे नियोजन करणे अशा उपाययोजना तातडीने अपेक्षित होत्या.

मात्र अद्याप कोणत्याही विहिरी किंवा विंधनविहिरी ताब्यात घेतल्याचे दिसून येत नाही. मग नगरपंचायत प्रशासन नेमके कोणत्या नियोजनावर काम करत आहे? दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही पाण्याच्या प्रश्नावर ठोस कृती होत नसेल, तर नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे स्वाभाविक आहे.

मोठमोठ्या घोषणा, पण ग्राउंड लेव्हलवर काम कुठे?

नगराध्यक्ष आणि गटनेते मोठमोठ्या गोष्टी करण्यात तरबेज असल्याची चर्चा शहरात आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली की पुढाकार कुठे हरवतो?

केजकरांना भाषणांची नव्हे, तर पाण्याची गरज आहे. बैठका, आश्वासने आणि घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. दुष्काळाच्या संकटात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार असेल, तर लोकप्रतिनिधींच्या कामाचा उपयोग काय?

केजकरांच्या तहानेची जबाबदारी कोण घेणार?

दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होण्याची शक्यता असताना नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याचे नियोजन जाहीर करावे. आमदारांनी पुढाकार घेऊन नगरपंचायत प्रशासनाची बैठक घ्यावी आणि शहरासाठी ठोस पाणीपुरवठा आराखडा तयार करावा.

केजकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नसून नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास ही बेफिकिरी शहरातील नागरिकांच्या मुळावर उठू शकते.

रोखठोक सवाल : दुष्काळ जाहीर होऊन महिना उलटला, मग केजकरांच्या पाण्यासाठी आमदार आणि नगराध्यक्षांनी आतापर्यंत नेमके केले तरी काय?

रोखठोक न्यूज – जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Related Post

केज शहराला लॉजचा विळखा! परवान्यांचा हिशेब कुठे? अवैध धंद्यांच्या संशयाने नागरिक संतप्त! अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न; लॉजची दिवसा-रात्री अचानक झडती घेण्याची मागणी
मन्मथ स्वामींच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसला! महिला भाविक जखमी; मस्साजोग येथे संतप्त भाविकांचा रास्ता रोको
भरधाव कारचा काळ बनून आला! दुचाकीवरील पती-पत्नीला भीषण धडक; दोघांचाही जागीच मृत्यू भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या कारने घेतला पती-पत्नीचा बळी? माजलगावच्या भीषण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर माजलगावच्या गढी रोडवरील थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद; धडकेची भीषणता पाहून काळजाचा ठोका चुकणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!