• Wed. Feb 19th, 2025

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूराचा मुकादमा कडून दगडाने ठेचून खून. कर्नाटकातील घटप्रभेतील घटना.

Bybaba maske

Dec 24, 2024

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूराचा मुकादमा कडून दगडाने ठेचून खून.

कर्नाटकातील घटप्रभेतील घटना.

रोखठोक न्युज वार्ताहर 

गोकाक, ता. २३ : येथून जवळच असणाऱ्या घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याचा त्याच्याच गावाचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याने झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे.

घटप्रभा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्या बाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता.

श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंड च्या डोक्यात चाळीस किलो पेक्षा मोठा दगड 

 घातला.व छातीवर बसून दगडणे तोंड डोके ठेचू लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबोड तोब ढाकणे याला पकडले. घटप्रभा पोलिसांना माहिती दिली.ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत.’ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण समजू शकले नाही. घटप्रभा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!