केजमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ, १२ गाड्या फोडल्या
पोलिस ठाण्या समोर महामार्गावर घडले सगळे
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज येथील पोलिस ठाण्याच्या समोरून जाणाऱ्या महामार्गावर एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात दगड घेऊन रस्त्याच्या मधोमध उभ्या राहिलेल्या नदीम सलीम शेख (वय ३५ रा. फुलेनगर, केज) या माथेफिरूने १२ वाहने फोडून वाहनांचे नुकसान केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील पोलिस ठाण्यासमोर नदीम सलीम शेख याने हातात काठी आणि दगड घेऊन रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता धुमाकूळ घालायला सुरुवात केली. रविवारची सुट्टी असल्यामुळे पोलिस ठाण्यातही पोलिस अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नव्हते. केज अंबाजोगाई महामार्गावरून ये-जा करणाऱ्या १२ वाहनांवर दगड फेकून काचा फोडल्या तर काही वाहनांवर काठी मारली. एक ट्रॅव्हल्स, टेम्पो, जीप, ऑटो रिक्षा, बससह ४ दुचाकींचेही त्याने नुकसान केले आहे. दरम्यान त्याच्याकडून हा धुमाकूळ चालू असताना
केज पोलिस ठाण्याच्या समोरून जाणाऱ्या महामार्गावर एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात दगड घेऊन रस्त्याच्या मधोमध उभा राहिलेल्या माथेफिरूने १२ वाहने फोडून केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान घडली.
रिक्षा पलटी होऊन तीन महिला जखमी
माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात ऑटो रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यात घराकडे जाणाऱ्या ३ महिला जखमी झाल्या होत्या. १० हून अधिक नागरिक व वाहनचालक हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांनी खासगी रुग्णालयातच उपचार घेतले.
काही वेळात तो बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी येऊन त्याला घरी घेऊन गेले.
