• Sat. Jan 25th, 2025

निलेश राणे केज कोर्टात हजर….प्रकाश आंबेडकर बदल अपशब्द खपवले जाणार नाही.वंचित बहुजन आघाडी.

Bybaba maske

Mar 29, 2023

निलेश राणे केज कोर्टात हजर….प्रकाश आंबेडकर बदल अपशब्द खपवले जाणार नाही.वंचित बहुजन आघाडी.

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सन २०२० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी माजी खा. निलेश राणे हे दि. २९ मार्च रोजी केज न्यायालयात हजर झाले.

या बाबतची माहिती अशी की, सन २०२० केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे आणि केज तालुक्यातील दोघे विवेक अंबाड, रा. लाडेगाव आणि रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव निर्माण होईल; अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या होत्या. म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली होती.

त्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, लाडेगाव ता. केज आणि विवेक चव्हाण पळसखेडा ता. केज यांच्या विरुद्ध ऑक्टोबर २०२० रोजी गु.र.नं. ४३२/२०२० भा.दं.वि. ५०५ (२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्लीकालीन पोळीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात पाठविले होते. त्या नंतर आज दि. २९ मार्च रोजी निलेश राणे हे न्यायाधीश पावसकर मॅडम यांच्या न्यायालयात हजर झाले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!