वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफार भाई यांच्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला प्राणघातक हल्ला.
रोखठोक न्युज वार्ताहर
वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफार भाई यांच्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळत असुन त्यांना पकडून जोरात काचेवर धडक देण्यात आली व त्याच्यां खिश्यातून 17000 हजार रूपय काढून घेतल्याचे त्यानी दवाखान्यातून व्हिडीओ रेकॉर्डिंग वरून सांगीतले आहे.त्याना परळी येथील दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. काल निवडणूकीत बुथ ताब्यात घेण्या वरून परळी काल खुप चर्चेत होती त्यातून हा प्रकार घडल्याच बोलले जात आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून या हल्याचा जाहीर निषेध केलाअसून. पोलीस प्रशासन गंभीर दखल घेऊन कारवाई करा अन्यथा परळी बंदचा इशारा देण्यात आला आहे.