• Wed. Jun 3rd, 2026

सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या.

Bybaba maske

May 15, 2024

सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या.

रोखठोक न्युज वार्ताहर

भारताचा माजी क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानानं स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. स्वत:च्या घरी असताना त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकाश कापडे असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं आपल्या राहत्या घरी कापडे यांनी स्वत:ला संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मागच्या १५ वर्षांपासून एसआरपीएफच्या सेवेत असलेल्या प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडंही सुरक्षारक्षक म्हणून काम केलं होतं. सध्या ते सचिनच्या मुंबईतील घरी सुरक्षेत तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर इथल्या गणपती नगर भागातील आपल्या घरी परतले होते. गणपती नगर येथील घरी आले होते. 

आज पहाटे घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर कापडे यांच्या घरीबाहेर आजूबाजूच्या लोकांनी व बघ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर घरातील लोक धावत त्यांच्या खोलीच्या दिशेनं गेले. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. मात्र स्वत:ला सावरत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर व पुरेशा तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!