• Thu. Oct 22nd, 2026

नेकनूरजवळ भीषण अपघात! अंबाजोगाईतील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Bybaba maske

Oct 11, 2026

नेकनूरजवळ भीषण अपघात! अंबाजोगाईतील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

टिपर-पिकअपची जोरदार धडक; दोन्ही वाहनांचा चक्काचूर, सहा जनावरांचाही दुर्दैवी अंत

रोखठोक न्यूज | प्रतिनिधी

अंबाजोगाई : अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर नेकनूरजवळ रविवारी दुपारी टिपर आणि पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाईतील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात हनीफ शौकत कुरेशी (वय २२) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०, दोघेही रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अपघातातील तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूरजवळ रविवारी दुपारी टिपर आणि पिकअप यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात टिपर चालक जखमी झाला आहे.

दरम्यान, पिकअपमधून वाहतूक करण्यात येत असलेल्या दोन गायी आणि तीन बैलांचाही या अपघातात मृत्यू झाला. माणसांसह मुक्या जनावरांचाही बळी गेल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

दोन तरुण भावांच्या मृत्यूने हळहळ

अंबाजोगाईतील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. तरुण वयात दोन्ही भावांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या भीषण अपघाताची अधिक माहिती आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!