• Thu. Oct 22nd, 2026

केज पोलिस ठाण्यात तक्रारदारांची एकमेकांशी झोंबाझोंबी पोलिसांचीच खुर्ची उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न

Bybaba maske

Oct 13, 2026

केज पोलिस ठाण्यात तक्रारदारांची एकमेकांशी झोंबाझोंबी

पोलिसांचीच खुर्ची उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न

रोखठोक न्यूज 

गौतम बचुटे, केज :- केज पोलिस ठाण्यात मारहाण झाल्याची तक्रार द्यायला आलेला तक्रारदार आणि दुसऱ्या गटात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या समक्ष एकमेकांत झोंबाझोंबी झाली. यात एकाचे चक्क पोलिसांची खुर्ची उचलून दुसऱ्याच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.

 

दि. १२ ऑक्टोबर रोजी केज पोलिस ठाण्यात रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, महिला पोलिस कॉन्स्टेबल तरकसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल सांगळे हे कर्तव्यावर हजर होते. 

त्या दरम्यान रात्री ११:४५ वा. च्या सुमारास कोल्हेवाडी ता. केज येथील महादेव प्रकाश आघाव, वय (२६ वर्षे) हे त्यांना झालेल्या मारहाणी संदर्भात तक्रार देण्यासाठी आले. त्यांना वैद्यकीय उपचाराचे पत्र देत असताना त्याचवेळी जलाल नगर, केज येथे रहात असलेले अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव, संगीता बाळु नेहरकर हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी महादेव आघाव यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी महादेव प्रकाश आघाव याने पोलीस स्टेशन मधील खुर्ची उचलुन अर्चना प्रकाश आघाव ह्यांना मारण्यासाठी उगारली, मात्र त्या वेळी तेथे हजर असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी ती खुर्ची महादेव आघाव यांच्या हिसकावुन घेतली. त्या नंतर दोन गटात झोंबाझोंबी झाली.

या पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर पोलिस ठाण्यातच झालेल्या भांडणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन, पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे यांच्या तक्रारी वरून महादेव प्रकाश आघाव, अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळु नेहरकर या चौघा विरुद्ध गु र नं ६४५/२०२६, भा न्या सं १९४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राम पवार हे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!