एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप
अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर
रोखठोक न्यूज वार्ताहर
माजलगाव तेलगाव रस्त्यावर कार आणि एसटीच्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडताच संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. सतत घडत असलेल्या अपघातात मागील ४ वर्षात ५० ते ६० जणांचा चळी गेला आहे आणखी किती बळी गेल्यावर हा रस्ता दुरुस्त होणार, हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा आहे असे म्हणत जोपर्यंत वरीष्ठ अधिकारी येथे येत नाहीत आणि ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. या रस्त्यावरील आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे
एसटी आणि कारची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (दि.१८) सकाळ ११:३० च्या सुमारास माजलगाव-तेलगाव रस्त्यावर पात्रुड जवळील शिंदेवाडी फाटा येथे घडली आहे. मयत माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील ४ जण असून १ जण राजस्थान येथील आहे ते तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. याचवेळी काळाने झडप घातली आहे. हा अपघात येथील पूलावर एक खड्डा असून तो चुकविण्याच्या नादात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार सरळ ती समोरुन येणाऱ्या एसटी खाली गेली यामुळे एका खड्ड्याने ५ जणांचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने माजलगाव तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.महादेव गिरी, गजानन महादेव नामदासे, समर्थ गजानन नामदासे, सोमनाथ बडे, अनिल आचारे अशी मयतांची नावे आहेत. हे सर्वजण कारमध्ये क्रमांक एम.एच. २६ ए के ४२१० मध्ये माजलगाव येथून तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान ते पात्रुड जवळील शिंदेवाडी फाटा येथे आले असता अचानक कार आणि तेलगावडून येणारी एसटी महामंडळाची बस क्र. एम.एच. २० बी एल २७४० याची समोरासमोर धडक झाली. यामुळे भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार एसटी खाली अडकून पूर्णपणे चक्काचूर झाली होती. यामध्ये जागीच पाच जण जागीच झाले आहेत. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित प्रवासी आणि हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदत केली. मात्र कार पूर्णपणे एसटी खाली दबल्याने मदत करण्यास अडचण निर्माण झाली. जेंव्हा
प्रवाशांना बाहेर काढले तेंव्हा मात्र ते मयतच निघत होते. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र एकाच वेळी पाच जणांचा बळी गेल्याने माजलगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
