• Wed. Feb 19th, 2025

अखेर अपहरण झालेल्या  युवा नेतृत्व संतोष देशमुख  यांचा काही  तासाने आढळला मृतदेह  मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालया रोखठोक न्युज वार्ताहर 

Bybaba maske

Dec 9, 2024

अखेर अपहरण झालेल्या  युवा नेतृत्व संतोष देशमुख  यांचा काही  तासाने आढळला मृतदेह 

मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालया

रोखठोक न्युज वार्ताहर 

तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली असून कर्तृत्वान युवा कार्यकर्ता गेल्याने मस्साजोग व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत.

त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत.या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नेमका हा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!