• Sun. May 31st, 2026

मस्साजोग चे सरपंचाचे अपहरण., स्कॉर्पिओ च्या काचा फोडून केले अपहरण.  पोलीसांचे दोन पथके शोधून आण्यास रवाना.

Bybaba maske

Dec 9, 2024

मस्साजोग चे सरपंचाचे अपहरण., स्कॉर्पिओ च्या काचा फोडून केले अपहरण. 

पोलीसांचे दोन पथके शोधून आण्यास रवाना.

रोखठोक न्युज वार्ताहर 

मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दिली असून या साठी मस्साजोग चे नागरिकांनी केज ठाण्यात गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्तांत असा की मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची स्कॉर्पिओ डोणगाव फाट्यावर दोन गाड्या त्यांच्या गाडी समोर आडवी लावली व चालक असलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा काच फोडून त्यांचे अपहरण केले.

  सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्याची नोंद दुपारी तीन वाजता झाल्याची फिर्याद शिवराज देशमुख यांनी दिली आहे.त्या अनुषंगानेच मस्साजोग च्या नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. दोन दिवसा पर्वीच मस्साजोग येथील पवनचक्की च्या ऑफिस झालेल्या राड्याचा यात काही सहभाग आहे किंवा त्यातून ही घटना घडल्याच बोलल जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!