निवडणुकीच्या कारणा वरून आक्षेपार्ह पोस्टवरून नांदुरघाट येथे दोन गटात झालेल्या दगडफेकीत
दोन्ही गटातील १५६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
हवेत गोळीबार केल्याचा आरोप.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील नांदुरघाट येथे निवडणुकीच्या कारणावरून एका नेत्यावर सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने गावात दंगल झाली आहे. या प्रकरणी पोलीस आणि एका जखमी व्यक्तीच्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दखल करण्यात आले आहेत.
केज तालुक्याील नांदूरघाट येथे दि. १५ में रोजी एकाने एक सोशल मीडियावर निवडणुकीच्या संदर्भात राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चीड निर्माण होईल अशा प्रकारची फेसबुक पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आणि आजूबाजूच्या गावातील नेत्यांचे समर्थक एकत्र जमा झाले. जमाव नांदूरघाट येथे जमा होताच त्यांच्यात व प्रतिस्पर्धी गट एकमेकांना भिडले. त्यांच्यात लाठ्या, काठ्या आणि दगड एकमेकांच्या दिशेने भिरकवू लागले. ही माहिती मिळताच दूरस्थ पोलीस ठाणे नांदूरघाट येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी उमेश आघाव यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देवून जमावाला आटोक्यात आणण्यासाठी जादा पोलीस कुमक पाठविण्याची मागणी केली. त्यानंतर केज सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरिक्षक वैभव सारंग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जमावाला काबूत आणले.
दरम्यान या दंगलीत जखमी असलेले राजेंद्र गोपाळघरे यांनी केज पोलीस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दी. १५ में रोजी रात्री ८:३० वा दि पत्नी कविता हे घरात असताना १०० ते १५० लोकांचा जमाव आला. त्या जमावाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी राजेंद्र गोपाळघरे यांना तुम्ही परवा झालेल्या लोकसभा निवडनुकीत कमळाचे फुलावर मतदान का केले? असे म्हणुन त्यांना मारहाण करण्यास केली. जमावातील लोक त्यांना जिवे ठार मारा असे ओरडु लागले व मारहाण करु करु लागले, सदर प्रकार पाहुन त्यांची पत्नी कविता ही त्यांना मारहाण करु नका, काय झाले ते सांगा असे म्हणून मला त्यांचे तावडीतुन सोडवीत असतांना त्यातील काही लोकांनी कविता गोपाळघरे यांच्या हाताला धरुन घराबाहेर ओढले. तसेच त्यांच्या हाताला, पायाला व नाकाच्या डाव्या बाजुला लाथा बुक्क्यानी मारहाण केली. जमावातील लोकांचे हातात काठ्या, तलवारी, दगडे होते. त्या पैकी आमोल सखाराम जाधव, श्रीकांत तुकाराम जाधव, सागर तुकाराम जाधव, शंकर भानुदास जाधव, सुधीर जाधव, प्रदिप जाधव व १०० ते १५० लोकांनी मनोज जरांगे पाटील जिंदाबाद अशा घोषना देवुन राजेंद्र गोपळघरे यांच्यावर व घरावर दगडफेक लागले. आमोल जाधव, श्रीकांत तुकाराम जाधव शंकर भानुदास जाधव, प्रदिप जाधव यांचे हातात तलवारी व लोखंडी गज होते. तसेच सागर जाधव याने त्याचे हातातील पिस्टलने हवेत गोळीबार केला. श्रीकांत तुकाराम जाधव याने त्याचे हातातील लोखंडी गजाने माझे डोक्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली तसेच अमोल जाधव याने त्याचे हातातील तलवारीची मुठ कविता गोपाळ घरे यांच्या नाकावर मारून जखमी केले अशा आशयाच्या फिर्यादीवरून के ज पोलीस ठाण्यात आमोल सखाराम जाधव, श्रीकांत तुकाराम जाधव, सागर तुकाराम जाधव, शंकर भानुदास जाधव, सुधीर जाधव, प्रदिप जाधव व १०० ते १५० यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५७/२०२४ भा दं वि ३०७, ३५४, ४५२, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्र अधिनियम ३, ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.
