• Mon. Apr 27th, 2026

बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक.

Bybaba maske

May 17, 2024

बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक

रोखठोक न्युज वार्ताहर

माहेरी गेलेल्या बायकोला परत घरी आणावयास गेलेल्या अजीम शेख या युवकाचा बस व मोटार सायकलच्या समोरासमोर धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंबाजोगाई येथील सदर बाजार परिसरात सध्या चनई येथे वास्तव्यास असलेला तसेच शहरातील मिलिया शाळेतील स्कुल बसचा चालक अजीम हज्जू शेख हा युवक पाटोदा येथे माहेरी गेलेल्या पत्नीस आणावयास जात होता. मात्र पाटोदा येथे पोचण्यापूर्वीच गावच्या पंधरा किलोमीटर अलीकडेच भिवंडी अहमदपूर (MH-13 CU7896) गाडीची समोरासमोर धडक होऊन त्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पाटोदा तसेच अंबाजोगाई शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!