ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी
केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारातील अपघात
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज : उंदरी शिवारातून येडेश्वरी कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अंबाजोगाईहून केजकडे जाणाऱ्या कारने पाठीमागून जोराची चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. धडक दिली. या भीषण अपघातात
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान उंदरी शिवारातून येडेश्वरी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर अंबाजोगाईहून केजकडे जाणारी कार क्रमांक एम.एच.४४ जी ३०६० पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात प्रीतम द्वारकादास तापडिया, ३६ व कार चालक शेखर भिसे, ३५ वर्षे, दोघेही रा. अंबाजोगाई हे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून दोन्हीही जखमींना
अपघातानंतर दोन्ही वाहने गायब
अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदरील अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून पोलिस पंचनामा होण्यापूर्वीच पसार झाली आहे.
तर ट्रॉलीतून रस्त्यावर पडलेला ऊसही दुसऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून कारखान्याकडे नेल्यामुळे या अपघाताची किंवा वाहनांच्या नंबरची आपल्याला काहीच माहिती नसल्याचेही जमादार केशव खाडे यांनी सांगितले.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. दोन्ही जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
