• Fri. Sep 18th, 2026

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक   महिलेसह तिघे जखमी; गावात पोलिसांची कुमक, तणावपूर्ण शांतता महिलेसह तिघे जखमी; गावात पोलिसांची कुमक, तणावपूर्ण शांतता

Bybaba maske

May 16, 2024

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

महिलेसह तिघे जखमी; गावात पोलिसांची कुमक, तणावपूर्ण शांतता

महिलेसह तिघे जखमी; गावात पोलिसांची कुमक, तणावपूर्ण शांतता

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरून दोन गट आमने-सामने आले. क्षणात एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक केली. यामध्ये एका महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केजसह जिल्ह्यातील पोलिसांची कुमक गावात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती.

गावातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. ही पोस्ट वादग्रस्त असल्याने दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झाले. बोलता बोलता वाद वाढत गेला आणि हाणामाऱ्या झाल्या. त्यानंतर नांदुरघाटसह आजूबाजूच्या गावांतील लोक नांदुरघाटमध्ये पाेहोचले. त्यानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला दगड लागला असून त्याला दोन टाके पडले आहेत. तसेच महिलेच्याही नाकाला गंभीर जखम झाली आहे. तिसरी व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. या सर्वांवर नांदुरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच केजचे सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मिणा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे फोर्स घेऊन गावात पोहोचले. बळाचा वापर करत जमाव पांगवला. त्यानंतर गावासह परिसरातील गावातील नागरिकांशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत गावात पोलिसांची मोठी फौज होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली नव्हती. गावात तणावपूर्ण शांतता होती.

“सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर दोन गट समोरासमोर भिडले. दगडफेकही झाली. माहिती मिळताच फोर्ससह गावात पोहोचलो. दगडफेकीत एका महिलेसह तिघे किरकोळ जखमी आहेत. सध्या गावात फोर्स असून शांततेचे आवाहन केले आहे.”

– प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक, केज

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!