• Fri. Sep 18th, 2026

जिजामाता मल्टीस्टेट गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षका सहीत दोन ताब्यात. 

Bybaba maske

May 16, 2024

जिजामाता मल्टीस्टेट गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षका सहीत दोन ताब्यात. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

– बीड जिल्हा पोलिस दलाची आर्थिक गुन्हे शाखा आता अडचणीत सापडली आहे. जिजामाता मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बीड एसीबीने कारवाई केली आहे. याप्रकरणात तब्बल पाच लाख रूपये घेताना एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिष खाडे, हे. कॉ. जाधवर, कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी हाती घेतली आहे. दरम्यान शिंदेंनी केलेल्या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमविण्याचे कुरण झाल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली होती. जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले. त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भुमिका कायम संशयास्पद राहिली. त्यातच आता जिजामाता मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. या बाबतची तक्रार बीड एसीबीकडे आली होती. तडजोडीअंती 30 लाख रूपये देण्याचे ठरले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात दहा लाख देण्यात येणार होते त्यानुसार या दहा लाखापैकी पाच लाख रुपये स्विकारताना बीडमधील एका खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी बीड एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, हे. कॉ. जाधवर आणि कुशाल प्रविण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. बीड एसीबीने बीडमध्ये केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!