• Fri. Sep 18th, 2026

बीडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा मोठा प्रहार; दोन ठिकाणी धाड, सात महिलांची सुटका, अनेक जण ताब्यात

Bybaba maske

Jul 30, 2026

बीडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा मोठा प्रहार; दोन ठिकाणी धाड, सात महिलांची सुटका, अनेक जण ताब्यात

रोखठोक न्यूज| प्रतिनिधी

बीड शहरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराविरोधात पोलिसांनी बुधवारी (२९ जुलै) रात्री मोठी कारवाई करत दोन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून काही पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एक चारचाकी, तीन दुचाकी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि पोलिसांच्या पथकाने रात्री सुमारे ९ वाजता बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकाजवळील एका हॉटेल-धाब्यावर छापा टाकला. येथे खुलेआम अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईदरम्यान सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच काही पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात संबंधित महिला बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील असल्याचे समोर आले आहे. मोबाईल क्रमांकांच्या माध्यमातून ऑनलाइन जाहिराती करून ग्राहकांना बोलावले जात असल्याची धक्कादायक माहितीही तपासात पुढे आली आहे.

तपासादरम्यान जागा मालक आणि दलालांच्या माध्यमातून कोलकाता, मुंबई व पुणे येथून महिलांना आणून हा व्यवसाय चालविला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, याच कारवाईच्या अनुषंगाने नगरनाका परिसरातही दुसरा छापा टाकण्यात आला. तेथे दोन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक मुदीराज व मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने केली.

रोखठोक NEWS या प्रकरणातील पुढील तपास आणि पोलिसांच्या कारवाईवर लक्ष ठेवून आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होतील.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!