• Fri. Sep 18th, 2026

अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर FDA ची धडक कारवाई; खाद्यपदार्थांचे नमुने जप्त, आस्थापना बंद

Bybaba maske

Aug 4, 2026

अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर FDA ची धडक कारवाई; खाद्यपदार्थांचे नमुने जप्त, आस्थापना बंद

रोखठोक न्यूज अंबाजोगाई | प्रतिनिधी

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अंबाजोगाईतील एका चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सोमवारी धडक कारवाई केली. ऑनलाइन प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने दखल घेत, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सदर बाजार परिसरातील तवक्कल चायनीज सेंटर येथे तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून, आवश्यक परवाना मिळेपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अंबाजोगाई व केज परिसरातील काही खाद्य व्यवसायांबाबत नागरिकांकडून ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पथक घटनास्थळी पाठवले.

तपासणीदरम्यान तवक्कल चायनीज सेंटरचे मालक इम्रान अनवर कुरेशी हे आवश्यक अन्न सुरक्षा परवान्याविना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य आणि विविध अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत आवश्यक परवाना प्राप्त होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईची माहिती शहरात पसरताच सदर बाजार परिसरातील अनेक हॉटेल्स, चायनीज सेंटर तसेच मांसविक्रीची दुकाने तातडीने बंद करण्यात आली. प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!