• Mon. Sep 21st, 2026

भरदिवसा सराफ व्यावसायिकास अडवून सोन्याच्या दागिन्यांची लूट; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, एक आरोपी जेरबंद – ६.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Bybaba maske

Aug 7, 2026

भरदिवसा सराफ व्यावसायिकास अडवून सोन्याच्या दागिन्यांची लूट; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, एक आरोपी जेरबंद – ६.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रोखठोक न्यूज| प्रतिनिधी :

बीड जिल्ह्यात भरदिवसा सराफ व्यावसायिकास अडवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून ६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी श्री. रमेश उदावंत (वय ४७ वर्षे, व्यवसाय – सोनार, रा. हिवरसिंगा, ता. जि. बीड) हे आष्टी येथील आठवडी बाजारात सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी मोटारसायकलने निघाले होते. सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास निंबडी–हिवरसिंगा रोडवरील पांड्या रंगाच्या शेताजवळ आले असता अज्ञात आरोपींनी त्यांना अडवून जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 230/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना रोहन उर्फ बॉबी संजय गवळी (वय २४ वर्षे, रा. शास्त्रीनगर, गांधीनगर नाका, बीड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-12 JM-4300) तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ६,९३,८०० किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजित घुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी वेतकोळे (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर ओटे, पोलीस अंमलदार दुबळे, पोलीस हवालदार गावकर, पोलीस बाळासाहेब नागरे, पोलीस भारती कांबळे, पोलीस रोहित शेख, पोलीस अधीकुमार गुरखे व चालक नितेश गाजरे यांनी सहभाग घेतला.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!