• Sat. Sep 19th, 2026

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई

Bybaba maske

Sep 19, 2026

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही!

केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई

रोखठोक न्यूज | वार्ताहर

केज : बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणात CIDच्या तपासातून मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करत CIDने केज न्यायालयात तब्बल 200 पानी दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये दहा आरोपींचा समावेश असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या दोषारोपपत्रात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव नसल्याचे समोर आले आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल ‘गावकरी’चे मालक विलास घुले यांची हत्या झाली होती. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या घुले यांच्यावर हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर प्रकरणाला राजकीय रंगही चढला आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव चर्चेत आले होते. त्यांच्या सहभागाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.

मात्र, CIDच्या तपासानंतर दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत चर्चेत असलेल्या आरोपांवर CIDच्या तपासाने वेगळे चित्र समोर आणले आहे.

15 सप्टेंबरला न्यायालयात 200 पानी चार्जशीट

या हत्या प्रकरणाचा तपास CIDकडे सोपविण्यात आल्यानंतर तपास यंत्रणेने विविध बाजूंनी तपास केला. तपास पूर्ण झाल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात 200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या दोषारोपपत्रात एकूण दहा आरोपींविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

आता पुढचा फैसला न्यायालयात!

CIDने तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः ज्यांचे नाव सुरुवातीपासून चर्चेत होते, त्यांचा दोषारोपपत्रात समावेश नसल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

रोखठोक न्यूज — जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!