• Tue. Sep 22nd, 2026

घरकुलाच्या पैशांवर लाचेचा डल्ला! ‘प्रति मस्टर १०० रुपये’ मागणारा ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात; बनेश्वर मंदिराजवळ रंगेहाथ अटक. बनसारोळा येथील घटना

Bybaba maske

Aug 7, 2026

घरकुलाच्या पैशांवर लाचेचा डल्ला!

प्रति मस्टर १०० रुपये’ मागणारा ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात; बनेश्वर मंदिराजवळ रंगेहाथ अटक.

बनसारोळा येथील घटना

बनसारोळा | प्रतिनिधी

गरीबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेलाच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी तब्बल प्रति मस्टर १०० रुपये लाचेची मागणी करणाऱ्या बनसारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या.

या कारवाईतील आरोपीचे नाव गोविंद सोपान गोरे (वय ५०), रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पीएम घरकुल योजनेअंतर्गत ३० मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी गोरे यांनी प्रति मस्टर १०० रुपये, अशा एकूण ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे बनेश्वर मंदिराजवळ तक्रारदाराकडून ३,००० रुपयांची लाच स्वीकारताना गोविंद गोरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बनसारोळा ग्रामपंचायत परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सरकारी योजनांमध्ये लाचखोरी किती खोलवर रुजली आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथील उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोखठोक प्रश्न

गरीबांच्या घरकुलाच्या पैशांवर डल्ला मारण्याचे धाडस सरकारी कर्मचाऱ्यांना नेमके कोणाच्या पाठबळावर येते? जनतेच्या हक्काच्या योजनांमध्ये लाच मागणाऱ्यांवर केवळ गुन्हेच नव्हे, तर कठोर प्रशासकीय कारवाईही झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!