• Tue. Sep 22nd, 2026

बीड जिल्ह्यातील खाद्यतेल उद्योगांवर एफडीएचे छापे कोट्यावधीचा माल जप्त

Bybaba maske

Aug 8, 2026

बीड जिल्ह्यातील खाद्यतेल उद्योगांवर एफडीएचे छापे

कोट्यावधीचा माल जप्त

रोखठोक न्यूज वार्ताहर बीड 

 अन्न प्रशासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने शुक्रवारी (दि.७) बीड जिल्ह्यात चार ठिकाणी खाद्यतेल उद्योगावर छापे मारले असून वेगवेगळ्या बॅण्डच्या खाद्यतेलासह सुट्टे खाद्यतेल असा कोट्यावधीचा तेलाचा साठा जप्त केला आहे. बीडमधील दोन, वडवणीमधील एक तर माजलगावमध्ये एका उद्योगावर ही छापेमारी करण्यात आली.राज्यभरात अन्न औषध प्रशासनाने भेसळ रोखण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. याच छापासत्राचा भाग म्हणून शुक्रवारी बीड जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली. बीडच्या एमआयडीसी भागातील स्वागत ऑईलमिल या ठिकाणी छापा मारण्यात आला. त्यावेळी वापरलेल्या टिनचा पुन्हा वापर करणे, स्वच्छता नसणे, अन्न सुरक्षा मानकाचे उल्लंघन असे आक्षेप नोंदवत सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. याच पथकाने बीडमध्ये चरखा ऑईलमिल या ठिकाणीही छापा मारला. येथून ७८ लाख २२ हजाराचे खाद्यतेल जप्त करण्यात आले.

वडवणीमध्ये व्यापारी बाहेरून तेल आणून ते स्थानिक पातळीवर पॅकींग करून विकत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत्या.  वडवणीमधील जय हनुमान ट्रेडर्स या ठिकाणी एफडीएच्या पथकाने छापा मारून ७ लाख २४ हजारांचे खाद्यतेल जप्त केले आहे. तर माजलगावच्या जानवी कमर्शियल या जुना मोंढा भागातील गोदामावर छापा मारून २ लाख ७९ हजाराचे खाद्यतेल जप्त केले. या कारवाईत अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे, सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री घोपे, श्री. मुळे, अजय गाडे, श्री. ठोंबरे यांच्या पथकाचा सहभाग होता. या कारवाईच्या सदराने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

वडवणीतील दुकाने दिवसभर बंद

अन्न औषध प्रशासनाने पथक वडवणीत आल्याचे कळताच शहरातील खाद्यतेल उद्योगांशी संबंधीत दुकाने तसेच किराणा दुकाने आपोआप बंद झाली. अनेक व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता दुकाने बंद ठेवली.

रिफाईंड, पामतेलाचा जप्तीत समावेश

एफडीएने जप्त केलेल्या या खाद्यतेल साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिफाईंड आणि पामतेल जप्त करण्यात आले आहे. काही ठिकाणी सोयाबिन तेल देखील जप्त करण्यात आले असून अनेक बॅण्डचे खाद्यतेल एफडीएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

baba maske

Related Post

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप! रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार
विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!