• Tue. Sep 22nd, 2026

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप! रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

Bybaba maske

Sep 22, 2026

केसच्या मदतीचे आमिष दाखवत पीएसआय कडून महिलेवर अत्याचाराचा आरोप!

रक्षकच झाला भक्षक; वडवणी पोलिस ठाण्यातील ग्रेड पीएसआय गणेश राठोड विरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

रोखठोक न्यूज | वार्ताहर, वडवणी

वडवणी : पतीविरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवत वडवणी पोलिस ठाण्यात कार्यरत ग्रेड पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड याने ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी वडवणी पोलिस ठाण्यात राठोडविरुद्ध अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

पोलिसांकडे न्यायासाठी येणाऱ्या महिलेच्याच असहायतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप पोलिस अधिकाऱ्यावर झाल्याने या घटनेने वडवणी पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

केसच्या ओळखीचे गैरफायदा घेतल्याचा आरोप

वडवणी पोलिस ठाण्यात ग्रेड पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड मागील काही वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी शहरातील एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. याच प्रकरणाच्या माध्यमातून राठोड आणि संबंधित महिलेची ओळख झाली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री राठोड याने “मी आज रात्री तुझ्या घरी येणार आहे” असे सांगितले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास तो महिलेच्या घरी गेला. “तू मला आवडतेस, मी तुला तुझ्या केस मध्ये मदत करतो,” असे सांगून त्याने अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप

घटनेनंतर पीडित महिला शनिवारी सकाळी वडवणी पोलिस ठाण्यात पोहोचली आणि संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदविण्याची विनंती केली. मात्र, आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अखेर शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता तिची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेची वैद्यकीय तपासणी

गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी पोलिस उपनिरीक्षक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाकडे आता संपूर्ण वडवणीकरांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!