• Sat. Jul 25th, 2026

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Bybaba maske

Jul 13, 2026

अंबाजोगाई हादरले! शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळ

दोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

रोखठोक न्यूज वार्ताहर | अंबाजोगाई

अंबाजोगाई शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरातील मध्यवर्ती तथागत चौकात सोमवारी पहाटे एका शिक्षकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विवेक करपे असे मृत शिक्षकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भर चौकात मृतदेह आढळल्याने सकाळी मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. शहरात अवघ्या दोन दिवसांत घडलेल्या दुसऱ्या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या शर्टाच्या खिशात एका खाजगी बसच्या प्रवासाचे तिकीट आढळून आले आहे. प्राथमिक स्तरावर अपघाताची शक्यता वर्तवली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत बारकाईने करत असून, तथागत चौक आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची छाननी सुरू करण्यात आली आहे. या फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!