बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश
केजचे पोलीस अधीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या जागेवर माजलगाव पोलीस निरीक्षक राहुल सुर्यसथळ
रोखठोक न्यूजवार्ताहर| प्रतिनिधी
प्रशासकीय गरज तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील कलम २२ (जे-१) नुसार जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना मंजुरी दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बदल्यांचे आदेश पुढीलप्रमाणे :
स्वप्नील कचरे उनवणे : प्रभारी, पोलीस ठाणे केज वरून प्रभारी, आगुशा शाखा बीड.
संतोष शंकर रोजाळ : प्रभारी, आगार शाखा बीड वरून प्रभारी, पोडशाखा (मु.) बीड.
अशोक काशिनाथ मुंदिराज : प्रभारी, पोडशाखा (मु.) बीड वरून प्रभारी, सायबर पोलीस ठाणे, बीड.
राहुल कामाजी सूर्यवंशी : प्रभारी, पोलीस ठाणे माजलगाव शहर वरून प्रभारी, पोलीस ठाणे केज.
प्रवीणकुमार युवराज वांगर : प्रभारी, पोलीस नियंत्रण कक्ष, बीड वरून प्रभारी, पोलीस ठाणे माजलगाव शहर.
निलेश एकनाथराव केळे : प्रभारी, सायबर पोलीस ठाणे, बीड वरून प्रभारी, पोलीस ठाणे पेठ बीड.
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने सर्व बाबींचा विचार करून या बदल्यांना मंजुरी दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेरबदलामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल आणि पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
