• Sat. Apr 18th, 2026

नगरपंचायतच्या उद्घाटन दिवशी नाराजी नाट्य: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्रमा कडे पाठ फिरवली.

Bybaba maske

Mar 29, 2023

नगरपंचायतच्या उद्घाटन दिवशी नाराजी नाट्य: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्रमा कडे पाठ फिरवली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत ने पाच कोटी च्या विकास कामाचे उद्घाटन करण्या साठी केज नगरपंचायत येथे आमदार नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा,यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन सोहळा ठेवला होता पण या कार्यक्रमास काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी पाठ फिरवल्याने जनतेत अश्चर्य व्यक्त केले जात होते.तत्पूर्वी राष्ट्रवादीचे गटनेते भाऊसाहेब गुंड व अजहर इनामदार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन जनविकास परिवर्तन आघाडी वर गंभीर आरोप केले.ज्या पाच कोटी चे विकास कामाचे उद्घाटन करत आहोत त्या पाच कोटी ला 500 लक्ष म्हणून खुप मोठी रक्कम केज च्या विकासा साठी आणल्याची वर्तमानपत्रात जाहीरात देऊन आवई उठवली.पण ही रक्कम गेल्या पंचवार्षिक मध्ये काँग्रेस च्या काळात आलेली होती ती फक्त खर्च केली गेली नव्हती व त्यातील 50 लक्ष रूपय हे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी नगरपंचायत ला निधी दिला होता.असे असताना ही या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार पृथ्वीराज साठे किंवा राष्ट्रवादीचे नेते तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे यांना निमंत्रित केले नाही.तसेच हा पाच कोटी चा निधी कोणत्या वार्डात टाकणार? गेल्या 11 महिन्यांपासून सत्तेत आलेल्या या आघाडीने, ना केजचा विकास केला ना आमच्या वार्डात कोणतेही काम केले.गेल्या 11 महिन्यांपासून जनरल अकाऊंट मधून पैसा खर्च केला जातो त्याचा कुठलाच ताळमेळ नाही.आता पर्यंत फक्त हार तुरे व सोहळ्यातील हे जनविकास परिवर्तन आघाडी चे सरकार निष्क्रिय आहे असे मत भाऊसाहेब गुंड व अजहर इनामदार यांनी व्यक्त केले.जर यांनी असाच मिंधा संसार चालू ठेवला तर याच जबाब विचारला जाईल.या नंतर जर समान न्याय प्रत्येक नगरसेवकास भेटला नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा देण्यात आला.आजच्या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच(5) व काँग्रेस चे तीन(3) उपनगराध्यक्ष सह सर्व गैरहजर राहिल्याने एक वेगळ्याच समीकरणांची चर्चा आता शहरात चर्चेली जात आहे.काँग्रेस प्रतिक्रिया विचारली असता तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता असे सांगण्यात आले.व बाकीच्या नगरसेवकास विचारले असता नाव न सांगण्याच्या अटी वर ते म्हणाले गेल्या आकरा महिन्यात “मै येव करूगां और त्यो करूगां” याचा कंटाळा आला आहे.आश्वासना पलीकडे कुठलेच काम नाही.या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे नगरपंचायत चे गटनेते भाऊसाहेब गुंड,नगरसेवक अजहर इनामदार, नगरसेवक बालाजी जाधव,नगरसेवक तस्लीम शेख,व जेष्ठ नेते तथा नगरसेवक मुस्तफा खुरेशी हजर होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!