• Wed. Jun 3rd, 2026

अल्पवयीन मुलीचे अपहरण : तिघा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Bybaba maske

Mar 30, 2023

 अल्पवयीन मुलीचे अपहरण : तिघा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने  अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिचे मोटार सायकलवरून अपहरण केले. या प्रकरणी तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २३ मार्च रोजी केज तालुक्यातील  पती-पत्नी हे त्यांची अल्पवयीन मुलगी व मुलाला घरी ठेवून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. एक दिवस मुक्कामी राहून ते दोघे दि. २४ मार्च रोजी ते परत गावी आले. मात्र त्यांना त्यांची मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी मुलाकडे चौकशी केली असता त्यांच्या मुलाने सांगितले की, त्याच्या अल्पवयीन बहिणीला गावातील सतीष दिलीप खंडागळे हा तिला मोटार सायकलीवर घेऊन गेला आहे. त्याच्या सोबत प्रकाश दिलीप खंडागळे रा. लाखा व मनोहर भांगे रा. हादगाव (डोका) हे दोघे होते. अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून दि. २८ मार्च रोजी तिच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात सतीष दिलीप खंडागळे, प्रकाश दिलीप खंडागळे, दोघे रा. लाखा व मनोहर भांगे रा. हादगाव (डोका) या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. १८३/२०२३ भा. दं. वि. ३६३ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!