आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल करायची धमक देत तरूणीवर बलात्कार.
आरोपी विरुद्ध बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि नुसार गुन्हा दाखल; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
रोखठोक न्युज वार्ताहर
केज – नीटची तयारी करीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. मोबाईलवर पीडितेच्या नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर पुन्हा वारंवार १० ते १२ वेळा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, सुमारे नऊ महिन्या पूर्वी जानेवारी २०२४ मध्ये केज येथील एक लातूर येथे वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटची तयारी करीत असलेली महाविद्यालयीन १९ वर्षाची तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली असता; तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. तो तिला म्हणाला की, तो पण लातूरला जात आहे. असे म्हणून त्याने त्या युवतीला त्याच्या चारचाकी कार मध्ये बसविले. के ज पासून पुढे ७० किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवीली. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने त्या हॉटेलच्या एका रूम मध्ये घेवून गेला. त्याने रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी तिने आरडा-ओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून तिचे अंगावरचे सर्व कपडे काढून त्याने तिच्या इच्छे विरुद्ध तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्या लैंगिक अत्याचाराचे त्याने मोबाईल मध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्या नंतर त्याने; तिने जर हा प्रकार कुणाला सांगितला तर ते सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या नंतर त्याने तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेवून सोडले. त्या प्रकार नंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई वडीलासह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी देवून तिला ब्लॅकमेल करून तिच्या सोबत त्याने अनेक वेळा सुमारे १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केला. भीतीपोटी व कुटुंबाच्या इज्जतीपोटी पीडित तरुणी हे सर्व सहन करीत होती. त्या नंतर एके दिवशी सूरज गुंड याने ते सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले.
त्या नंतर आईवडिलांनी त्या तरुणीला याचा जाब विचारल्या नंतर तिने सर्व प्रकार सांगितला. त्या नंतर त्यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकारची कल्पना दिल्या नंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांचे लेखनिक पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या मदतीने पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेतली. तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या सूरज गुंड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८५/२०२४ भा. न्या. सं. २०२३ अधिनियम कलम ६४ (१), ६४ (२) (एम), ३३२ (ब), ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१ (२) यासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(२) (पाच), ३ (२) (व्ही ए), ३(१) (आर), ३(१) (एस) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६, ६६ (ई) नुसार बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि आय टी अॅक्ट नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने आरोपी फरार होवू नये याची दक्षता घेत केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून गुन्हा दाखल होताच त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.
इन्स्टाग्रामवरची मैत्री महागात पडली
पीडित तरुणीने आणि सूरज गुंड यांची इन्स्टाग्रामवरची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. त्या नंतर त्यांची इन्स्टाग्रामवरची ओळख झाली त्यातून ते एकमेकांशी बोलत होते. त्याचा गैरफायदा घेत तो एके दिवशी तिच्या हॉस्टेलवर गेला आणि त्याने फोन करून बाहेर बोलावून घेतले व ते दोघे मोटार सायकलवर शहरात फिरले.
लॉजचाही गोरखधंदा
त्या तरुणीने तक्रारीत तिच्यावर वारंवार ज्या लॉज मध्ये अत्याचार झाला त्या लॉजमध्ये त्यांचे ओळख पत्र किंवा आधार कार्ड न पाहता त्यांना रूम कशी काय दिली? याचाही पोलीस तपास होईल.
बळजबरीने घरात घुसून माथ्यावर कुंकू लावून लग्न केल्याची सेल्फी काढली
जून २०२४ मध्ये ती तरुणी ही एकटी घरी असताना सूरज गुंड हा तीच्या घरात घुसला. त्याने जबरदस्तीने तिच्या डोक्यावर सिन्दुर लावून त्याचा सेल्फी काढला व “तू माझी बायको झालीस.” असे म्हणून पुन्हा तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक संबंध केला.
सखी केंद्राची भूमिका संशयांच्या भोवऱ्यात
सततच्या वारंवार होणाऱ्या अत्याचार आणि त्रासाला कंटाळून त्या तरुणींनी दि. २० जुलै रोजी सूरज गुंड हा तीला त्रास देत असल्याची माहिती आई-वडिलांना दिल्या नंतर दि. २३ रोजी ते तिघे बीड येथील सखी केंद्रात गेले होते. त्या नंतर दि. २९ जून रोजी सूरज गुंड याला सखी केंद्रात बोलावून त्याच्या कडून तो त्या तरुणीला पुन्हा त्रास देणार नाही. असे त्याच्याकडून लेखी पत्र घेतले होते. मात्र एवढा गंभीर व लैंगिक अत्याचाराचा प्रकार असतानाही पोलिसांना याची माहिती न देता केवळ लेखी पत्र घेवून प्रकरण दडपण्याचा तर प्रकार नव्हता काय ? यामुळे सखी केंद्राच्या व तेथील अधिकारी यांच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.
आई-वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची धमकी देत फोटो व व्हिडिओ केले व्हायरल
सूरज गुंड याने दि. ९ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीच्या वडिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटून त्यांच्या मुली सोबत लग्न करण्याची धमकी दिली आणि त्या नंतर त्याने तिचे नग्न फोटो व त्याच्या सोबतचे लैंगिक संबंधाचे व्हडिओ पीडित तरुणीच्या आई वडिलांच्या मोबाईलवर व्हायरल केले. पीडित तरुणीचे आई- वडील हे प्रचंड दडपण आणि तणावाखाली असून त्यांनी सूरज गुंड याच्या भीतीपोटी त्यांचे घर विकून गाव सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
