• Tue. Nov 17th, 2026

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली १५ गोवंश जनावरांची सुटका! चिंचोळीमाळी येथील पाझर तलावाजवळ पोलिसांची कारवाई; १२ बैल आणि ३ गायी ताब्यात, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bybaba maske

Nov 14, 2026

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली १५ गोवंश जनावरांची सुटका!

चिंचोळीमाळी येथील पाझर तलावाजवळ पोलिसांची कारवाई; १२ बैल आणि ३ गायी ताब्यात, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रोखठोक न्यूज वार्ताहर

केज तालुक्यातील चिंचोळीमाळी येथे कत्तलीच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी क्रूरपणे बांधून ठेवलेल्या १५ गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली. यामध्ये १२ बैल आणि ३ गायींचा समावेश असून, पोलिसांनी एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी व कत्तलीच्या संशयास्पद प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चिंचोळीमाळी येथील रस्त्यालगत असलेल्या पाझर तलावाजवळ भिंतीलगत सार्वजनिक ठिकाणी १२ बैल व ३ गायी अशी एकूण १५ जनावरे अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवलेली आढळून आली. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी बांधून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल शेषेराव तरकसे यांनी फिर्याद दिली असून, केज पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ७१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

केज शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १५ गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना ताब्यात घेतले असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना क्रूरतेने बांधून ठेवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गोप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

baba maske

Related Post

कला केंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा छळ! डांबून ठेवून अनैतिक कृत्यांसाठी दबाव; बनावट आधारकार्ड तयार केल्याचाही आरोप, केजमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दोन वर्षांपासून ₹१ कोटी ४९ लाखांचा रस्ता कागदावरच! निधी गेला कुठे? कंत्राटदार पोसला की सत्ताधारी आणि अधिकारी? फुलेनगरमधील सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचा पत्ता नाही; नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह, चौ
नळापर्यंत पाणी पोहोचत नाही, रस्त्याचा पत्ताच नाही! सम्राट नगर, जयभीम नगरला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले? मागासवर्गीय वस्ती असल्याने प्रशासनाचा दुजाभाव? नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप; नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, आमदार नमिता मुंदडा लक्ष देणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!