केज १३२ के.व्ही. उपकेंद्रात भीषण आग! कॅपेसिटर डीपीला आग लागल्याने परिसरात खळबळ
केज | रोखठोक न्यूज
केज येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात शनिवारी रात्री कॅपेसिटर डीपीला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ दिसून आले. आगीच्या तीव्रतेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपकेंद्रातील कॅपेसिटर डीपीला आग लागल्याने आकाशात लालभडक ज्वाळा दिसत होत्या. रात्रीच्या अंधारात आगीचे दृश्य अधिकच भयावह दिसत होते.
दरम्यान, या आगीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होणार का, याबाबत महापारेषणकडून माहिती देण्यात आली आहे. कॅपेसिटर डीपीला आग लागली असली तरी वीजपुरवठ्यात अडचण येणार नसल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे.
आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
