उपजिल्हा रुग्णालय केज येथे स्वच्छ मौखिक अभियान संपन्न
रोखठोक न्युज वार्ताहर
मा.डॉ.संजय राउत वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय व डाॅ विशाल करपे केज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ मुख अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपस्थित सर्व रुग्णांना तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना दंत व मौखिक आरोग्याचे महत्त्व, मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजी तसेच ब्रश करण्याची आदर्श पद्धती ब्रश आणि मॉडेल घेऊन सविस्तरपणे डॉ. रमण दळवी यांनी समजावून सांगितली. आयोजनासाठी श्रीमती सीता गिरी समुपदेशक यांचे विशेष सहकार्य होते. कार्यक्रमास प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री बहिरट साहेब, श्री संतोष देवकते, सौ शोभा साकसमुद्रे,क्ष किरण तंत्रज्ञ श्री सुजित जाधव, औषध निर्माता श्री बालाजी टेकाळे तसेच सेक्युरिटी गार्ड इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व रुग्णांना मौखिक आरोग्याची माहिती असणारे माहिती पत्रक देखील वितरण करण्यात आले.