• Fri. Sep 11th, 2026

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ

Bybaba maske

Sep 9, 2026

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!

मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ

उमरगा | प्रतिनिधी :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता धाराशिव जिल्ह्यातही तीव्र होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी उमरगा तहसील कार्यालयात तहसीलदारांची खुर्ची जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

दरम्यान, खुर्ची जाळण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे उमरग्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई काय केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोखठोक न्यूज | जन सामान्याच्या अन्यायाविरोधात आवाज

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!