• Mon. Jun 22nd, 2026

जिलेटिन काड्याचा स्फोट होऊन मुला देखत वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी.

Bybaba maske

May 24, 2023

जिलेटिन काड्याचा स्फोट होऊन मुला देखत वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु असताना जिलेटिनच्या स्फोटात ३५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा व बाजूला असलेला पोकलेनचा ऑपरेटर जखमी झाला आहे. ही घटना बीड तालुक्यातील राक्षसभुवन येथे बुधवारी (दि.24) सकाळी घडली.

आप्पासाहेब मस्के (वय 35) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. मागील दोन दिवसापासून काम बंद होते. मात्र विहिरीतील खडक फोडण्यासाठी ब्लस्टिंगसाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधावर झाकून ठेवलेल्या होत्या. याबाबत आप्पासाहेब मस्के यांना काहीच कल्पना नव्हती. आज सकाळी ते बांध पेटवत होते. बांधाची पेटलेली आग ही जीलेटीनपर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या त्यांच्या मुलाला जीलेटीन तिथे ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथे ठेवलेल्या जीलेटीनची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे धावला. परंतू तेवढ्यात मोठा स्फोट झाला. यामध्ये अप्पासाहेब मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा व बाजूला असलेला पोकलेन ऑपरेटर जखमी झाला आहे. जखमीवर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!