• Sun. Apr 19th, 2026

केज मधून ४४ वर्षीय इसम बेपत्ता

Bybaba maske

Jul 29, 2023

केज मधून ४४ वर्षीय इसम बेपत्ता

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- शेतात पेरलेले सोयाबीन उगवले की, नाही? हे पाहायला गेलेला ४४ वर्षीय इसम घरी परत आलेला नाही. तो बेपत्ता झाला आहे.

केज येथील शाहूनगर येथे आपल्या कुटुंबा सोबत राहत असलेले ४४ वर्षा वयाचे रामदास सकपाळ हे दि. ११ जुलै रोजी दुपारी २:३० वा च्या सुमारास मोबाईल घरी चार्जिंगला लावून मोटार सायकली वरून केकतसारणी ता केज येथील शेतात पेरलेले सोयाबीन उगवले की, नाही? ते पाहाण्यासाठी शेतात गेले होते. ते घरी परत आले नाहीत आणि त्यांच्या सोबत मोबाईल पण नाही. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. म्हणून त्यांची पत्नी सौ. राधाबाई सकपाळ यांच्या तक्रारी नुसार रामदास सकपाळ हे बेपत्ता असल्याची नोंद केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या बाबत पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे तपास करीत असून त्यांच्या बाबत कुणाला काही माहिती असेल किंवा ते आढळुल आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा केज पोलिसांना कळविण्याचे आवाहन केज पोलिसांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!