• Sun. Apr 19th, 2026

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार.

Bybaba maske

Oct 19, 2023

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील बोरी सावरगाव ते आंबेजोगाई दरम्यान अज्ञात वाहनाने मोटार सायकल ला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले वय 37 वर्षे आणि वासुदेव अनंत देशपांडे वय 43 वर्षे हे दोघे बुधवारी (दि.18) रात्री 11:30 च्या दरम्यान बोरी सावरगावहून आंबेजोगाईला निघालेले असताना त्यांची दुचाकी खटकळी पुला जवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सदरील घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार श्री. बडे यांनी पुढील कार्यवाही करत त्यांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणि त्या ठिकाणी दोघांच्याही मृतदेहाचे शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरील अपघात नेमका कसा घडला याची चौकशी एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस करत आहेत…

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!