महापुरुषा बद्दल अपशब्द वापरले त्याला कायदेशीर भीम टोला.
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- राष्ट्रपुरुषा बाबत अपशब्द वापरून त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या माथेफीरुला सामाजिक कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १३ ऑक्टोबर रोजी अजय सुंदरराव कदम यांनी त्यांच्या मोबाईल वरून सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे यांना एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठविली. त्या मध्ये एक व्यक्ती ही राष्ट्रपुरुषा बाबत अवमानकारक शब्द वापरीत होता. त्या नंतर लखन हजारे यांनी अजय कदम यास फोन करुन अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव विचारले असता तो माथेफिरू हा अजय भागवत जोगदंड (रा. येवता ता. केज जि. बीड) हा असल्याचे समजले.
त्या नंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वा.च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, सुमेध शिंदे व दिपक वाघमारे हे तिघे येवता ता. केज येथे गेले आणि त्यांनी त्याला या प्रकारा बद्दल जाब विचारता असता त्याने तिघांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा तो प्रकार केला. म्हणून लखन हजारे यांच्या फिर्यादी वरून दि. १६ ऑक्टोबर रोजी अजय जोगदंड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६२४/२०२३ ॲट्रॉसिटी कलम ३ (१) (आर) ३ (१) (एस) यासह भा. दं. वि. ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे तपास करीत आहेत.